Mushroom Information Portal-Biobritte Agro

Get all mushroom information here

Like our Facebook Page

LightBlog
LightBlog

Tuesday, February 19, 2019

मश्रूम शेतीला वाव आहे का?हा नक्कीच आहे. आता भारतामध्ये पूर्ण सेंद्रिय शेती चा ट्रेंड आला आहे. कमी जागे मध्ये मश्रूम शेती करून तुम्ही चांगल्या प्रकारे स्वयंरोजगार बनवू शकता. या शेतीमध्ये प्रामुख्याने दोन गोष्टी गरजेच्या असतात- एक आहे मश्रूम ची निट लागवड आणि दुसरे म्हणजे मार्केटिंग.

मश्रूम लागवडीबद्दल सांगायचे म्हंटल तर मश्रूम शेती कमी वेळेत केली जावू शकते. एकदा मश्रूमची लागवड केली कि त्याकडे जास्त लक्ष द्यावे लागत नाही. त्यामुळे तिथे जास्त अनुभवी व्यक्ती ची गरज नसते.

मश्रूम ची मार्केटिंग- 
मश्रूम ची मार्केटिंग खालील प्रकारे केली जावू शकते.
१.     फ्रेश किवा ड्राय मश्रूम विकणे- फ्रेश किवा ड्राय मश्रूम हे तुम्ही खानावळी, हॉटेल्स, केटरिंग, भाजीपाला विक्रेते यांना विकू शकता. त्यासाठी मश्रूम चा दर्जा हा महत्वाचा असतो. बर्याच वेळा ग्राहकाला माहित नसते कि मश्रूम की असते. त्या वेळेस त्याला मश्रूम चे सर्व माहिती सांगणे गरजेचे असते.

२.     नवीन मश्रूम उत्पादक मार्केटिंग करण्यासाठी उतरत नाहीत त्यामुळे बर्याच वेळा ते आपला व्यवसाय बंद करतात. पण मश्रूम शेती मध्ये असलेला फायदा पहता स्वत: मार्केटिंग मध्ये उतरण्यासाठी काही हरकत नसते. मश्रूम हा प्रकार आता लोकांनी भाजीपाला मानून मानायला चालू केला आहे. तेव्हा स्वत जर लोकांना याचे फायदे पटवून दिले आणि ते चांगल्या दर्जाचे असताना लोकांना विकले तर फायदा होवू शकतो. यासाठी आरोग्य विषयांमध्ये काम करणाऱ्या लोकांची मदत घ्यावी जसे वैद्य, जिम, किवा खेळाडू. आता आहाराबद्दल जागरूकता तयार झाल्याने लोकांनी मश्रूमला एक चांगले आरोग्यवर्धक खाद्य मानून पाहायला चालू केले आहे. लोकांना अपुरे माहिती असल्याने ते मार्केटिंग करताना चुकतात. त्यामुळे पूर्ण माहिती करून घेतल्यास नक्कीच यामध्ये चांगला रोजगार बनवला जावू शकतो.  मश्रूम मूल्यवर्धित पदार्थ बनवणे: मश्रूम पासून वेगवेगळे मूल्यवर्धित पदार्थ बनवता येतात. ज्यामध्ये पावडर सूप, चिप्स, ब्रेड,बिस्कीट,मसाले,शेवया,आयुर्वेदिक औषधे व लोणचे, भाजी, वाईन, बीअर, मसाले, चटणी व इतर आहेत.
४.      मश्रूम बनवताना ते सेंद्रिय पद्धतीने बनवावेत. जेणेकरून लोकांना विकत घेताना त्याचा दर्जा वाढतो व त्याची किंमत हि जास्त मिळू शकते.

मशरूम उत्पादन ,प्रशिक्षण, मूल्यवर्धित मशरूम पदार्थ उत्पादन आणि मशरूम मार्केटिंग सारख्या इतर माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा.
मशरूम लर्निंग सेंटर, जयसिंगपूर-कोल्हापूर
फोनः 9923806933

Adbox